महावीर जैन यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार

महावीर जैन यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        मोताळा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी महावीर जैन ३० जून रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने राजर्षी शाहू परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
        राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी प्रदीर्घ प्रशासकीय व शैक्षणिक सेवेचा गौरव म्हणून त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि निरोगी दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी शीलाताई जैन, सदानंद देशमुख, सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, गुंतवणूक अधिकारी सुशील गुळवे उपस्थित होते.