* अपंग कसाई बाप जेरबंद, गांव हळहळले
सिंदखेड राजा : (एशिया मंच वृत्त)
आईच्या कुशीत साखरझोपेत असलेल्या चिमुकल्यास लघवीला जायचे म्हणून उठवून नेत घरा जवळ असलेल्या नदीपात्रात निर्दयतेने गळा दाबून खून करून मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना 25 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार असे समजते की, मौजे सवडद येथील अपंग युवक सिध्देश्वर सखाराम नन्हई 40 हा दररोज दाऊ पिऊन पत्नी व मुलांना त्रास द्यायचा ऐवढेच गांवातील लोकांना सुद्धा त्रास द्यायचा दरम्यान एक महिन्यापासून तो साखरखेर्डा येथे भाड्याच्या जागेत राहायचा मात्र चार दिवसांपासून तो पुन्हा सवडद मध्ये माळीपुरा येथे राहायला आला होता. मात्र त्याच्या वागणूकीत कोठेही बदल झाला नाही दरम्यान 25 डिसेंबर रोजी सकाळी सिध्देश्वर त्याची मुलगी जान्हवी वय 5 , मुलगा अमर वय 13, पत्नी रत्नमाला गाढ झोपेत असताना सकाळी चारचे सुमारास त्याने आईच्या कुशीत झोपलेल्या अमरला शौचास जायचे म्हणून सोबत घेऊन गेला. घराबाहेर पडल्यावर त्याचा गळा दाबला असता चिमुकल्या अमरने आर्तकिंकाळी ठोकली. दरम्यान आजूबाजूला कुणीही नसल्याने त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र क्रुर पित्याने त्याला कडेवर घेऊन त्याचागळा आवळून कोराडी नदीच्या पात्रात बुडवून निर्दयीपणे खून केला. तद्नंतर सिध्देश्वर हा मी माझ्या मुलाला मारल्याचे जाहिरपणे सांगत असताना घरी अमर नसल्याने खरोखर अमरचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान गावकऱ्यांनी सिध्देश्वर यास पोलीसांच्या हवाली करून मृतदेह नेमका कोठे टाकला याची माहिती घेऊन कोराडी नदीपात्रातील नाल्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला असून आरोपी सिध्देश्वर नन्हई यास अटक करण्यात आली आहे.
गत दीड महिन्यांपासून गांवात मृत्यूची मालिका सुरू असून दीड महिन्यात कुणी आत्महत्या तर आकस्मित, दीर्घ आजाराने असे एकूण 19 लोकांचे निधन झाले असून हा विसावा मृत्यू आहे. अमरच्या निर्दयी हत्येने सवडद गाव सुन्न झाले आहे. अमर हा सवडद येथील जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गात शिकत होता. मात्र राक्षसी वृत्तीच्या पित्याने त्याचा काटा काढला असून अशा राक्षसी पित्याला कडक शासन करावे अशी आर्जव ग्रामस्थ करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जितेंद्र आडोळे, दुय्यम ठाणेदार सचिन कानडे, एएसआय सुरतसिंग इंगळे, पोहेकॉ अशोक काशिकर, पो. नायक अनिल वाघ यांनी घटनेचा पंचनामा करून नेमका गळा दाबून खून केला का कि पाण्यात बुडवून? या दिशेने पोलीस तपास सुरु आहे. करीता सदर मृतदेह मेहेकर येथून अकोला फॉरेन्सिक तपासणी साठी पाठविण्यात आला आहे. पोलीसांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.