मुंब्र्यातील राजकारणात मोठी घडामोड! * सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश* युनूस शेख यांच्याकडे कलवा-मुंब्रा ‘केबल सेना’ अध्यक्षपदाची जबाबदारी; राजकीय समीकरणांकडे लक्ष



मुंब्र्यातील राजकारणात मोठी घडामोड! 
* सहर शेख यांच्या वडिलांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
* युनूस शेख यांच्याकडे कलवा-मुंब्रा ‘केबल सेना’ अध्यक्षपदाची जबाबदारी; राजकीय समीकरणांकडे लक्ष
मुंब्रा : (एशिया मंच न्यूज )
        ‘पूरा मुंब्रा हरा करना है’ या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
       मिळालेल्या माहितीनुसार, युनूस शेख यांची कलवा-मुंब्रा परिसरातील केबल ऑपरेटरांच्या ‘केबल सेना’ संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार झाल्याचे सांगितले जात आहे.
        सहर शेख या एमआयएमच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून, त्यांच्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता त्यांच्या वडिलांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या वृत्तामुळे मुंब्र्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या घडामोडीचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.