उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ; बुलढाण्यात शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश* जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांची उपस्थिती

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ; बुलढाण्यात शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
* जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांची उपस्थिती
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत बुलढाणा शहरातील वसीम खान अलीम खान, नझीम खान अलीम खान, अब्दुल खालिद शेख नसीम,  आकिब चौधरी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडला.

       यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके आणि जिल्हा समन्वयक गजानन धांडे, शहरप्रमुख विजय राऊत यांची उपस्थिती होती. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नव्याने पक्षात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

        पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच पक्षाची विचारधारा आणि जनहितासाठीची भूमिका यांच्याशी एकनिष्ठ राहण्याच्या उद्देशाने या चौघांनी पक्षात प्रवेश केला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा आणि समाजातील विविध घटकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

      नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.