* विदर्भातील सर्वात भव्य गरब्याच्या १९ व्या वर्षाचे दमदार आयोजन, 'Save Nature' थीम
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरात गरबा प्रेमींसाठी मोठी पर्वणी असणार आहे. BCCN बुलडाणा अर्बन आयोजित १९ वा भव्य गरबा महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विदर्भातील सर्वात भव्य गरबा महोत्सव अशी ओळख असलेल्या या महोत्सवाची तयारी सुरू झाली आहे."जल्लोष करूया, गरब्याच्या रंगात रंगूया!" या टॅगलाईन खाली यंदाचा महोत्सव पर्यावरण पूरक संदेश देणार आहे. यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती थीम 'SAVE NATURE - Green Today, Brighter Tomorrow' अशी ठेवण्यात आली आहे. गरबा महोत्सवापूर्वी गरबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे आयोजकांनी फ्री गरबा वर्कशॉप चे आयोजन केले आहे.
फ्री गरबा वर्कशॉप :
• दिनांक: १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत • स्थळ: तिरुपती मंगल कार्यालय, बुलडाणा • वेळ: सायंकाळी ६ ते ८
नवीन शिकणाऱ्यांसाठी आणि गरब्यात आपले कौशल्य वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. BCCN LIVE आणि City LIVE यांच्या माध्यमातून या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण आणि अपडेट्स दिले जाणार आहेत.तरी सर्व गरबा प्रेमींनी या फ्री वर्कशॉपचा आणि १९ व्या भव्य गरबा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन BCCN बुलडाणा अर्बन , सिटी न्यूज तर्फे करण्यात आले आहे.
