प्रा. लहाने सर दाखल करणार सोमवारी उमेदवारी अर्ज!

प्रा. लहाने सर दाखल करणार सोमवारी उमेदवारी अर्ज!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        राजकारण , समाजकारण व शैक्षणिक क्षेत्रातील दमदार नाव प्रा. डी. एस. लहाने ५ ऑक्टोबर रोजी अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत, आ.नितीन देशमुख, आ.ज मो.अभ्यंकर ,आ. सिद्धार्थ खरात, गजानन लवटे, दरेकर, राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, पदाधिकारी व शिक्षकांच्या उपस्थितीत अमरावती येथे ही उमेदवारी दाखल केली जात आहे.
        शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार म्हणून प्रा. लहाने यांना पहिल्या क्रमांकाची पसंती दिली. सर्व राजकीय पक्षांमध्ये पहिली उमेदवारी घोषित झाली. ती प्राध्यापक लहाने यांची सुरुवातीपासून ते जोमाने कामाला लागले आहे. व्यवसायाने शिक्षक असणारे प्रा.डी. एस. सर शिक्षकांच्या समस्या चांगल्या जाणून आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी आपले घोषणापत्र सार्वजनिक करून आमदार झाल्यास मानधन घेणार नाही, याची आगळी वेगळी घोषणा करून आपले वेगळेपण सिद्ध केले. त्यांनी स्थापन केलेले मानस फाउंडेशन राज्यामध्ये आगळे- वेगळे काम करत आहे. विधवा भगिनींसाठी अहोरात्र झटणारा भाऊ म्हणून प्रा. लहाने सरांची ओळख राज्यभर आहे.

       अनेक विधवा महिलांच्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये मोफत शिकवल्या जाते. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना सामाजिक बांधिलकीशी हा माणूस कायम बांधील राहिला आहे. अमरावती विभागातील सर्व उमेदवारात प्राध्यापक लहाने हे नाव त्यामुळे आदराने घेतले जाते. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर त्यांनी उभं केलेले त्यांच सामाजिक कार्य त्यांच्या सामाजिक दृष्टीची साक्ष आहे. जिल्हा परिषद मध्ये जनतेतून निवडून येऊन त्यांनी आपल्या राजकीय परिपक्वतेचा परिचय पूर्वीच दिला आहे. मिनी मंत्रालयाचा अनुभव घेतल्यानंतर आता ते मंत्रालयात जाण्यासाठी सिद्ध झाले आहे. त्यांचे चाहते व शिवसैनिकांच्या उपस्थितीत अमरावती येथे ते उद्या उमेदवारी दाखल करणार आहे.