शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार सुरेश देवकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार* अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; माजी शिक्षक आमदार कपिल पाटील राहणार उपस्थित

शिक्षक भारतीचे अधिकृत उमेदवार सुरेश देवकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
* अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; माजी शिक्षक आमदार कपिल पाटील राहणार उपस्थित
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २०२६ जाहीर झाली असून, शिक्षक भारती संघटनेचे अधिकृत उमेदवार सुरेश देवकर हे सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमासाठी शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
       नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी विभागातील शिक्षक भारतीचे पदाधिकारी, सदस्य तसेच शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. ‘शिक्षणाच्या हक्कासाठी! शिक्षकांच्या सन्मानासाठी!’ या घोषवाक्यासह शिक्षक भारतीच्या पदाधिकारी व शिक्षकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  कार्यक्रम :  सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६,  दुपारी १ वाजता, मुक्ताई पॅलेस, राहाटगाव रिंग रोड, अमरावती.