चिखली उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढीची सुविधा उपलब्ध करून द्यावी* सामाजिक कार्यकर्ते राहुल चवरे यांची मागणी

चिखली उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढीची सुविधा उपलब्ध करून द्यावी
* सामाजिक कार्यकर्ते राहुल चवरे यांची मागणी

चिखली : (एशिया मंच न्यूज )
     शहरातील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्या मधून शेकडो रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येतात. अपघात ग्रस्त रुग्ण, प्रस्तुतीसाठी येणाऱ्या माता, आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण यांना आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची आवश्यकता भासते. अशा वेळेस रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांची खूपच धावपळ होते. रक्त पुरवठा वेळेवर न झाल्यामुळे परिणामी एखादा रुग्ण दगावू शकतो. रुग्णाचे प्राण वाचावे. या सर्व बाबींचा विचार करून
रुग्णालयात रक्तपेढी सुरू करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल चवरे यांनी तालुका आरोग्य अधिकारी चिखली यांच्याकडे केली आहे. 

       नुकताच संपूर्ण देशात एक आक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय स्वेच्छिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला गेला. शहरातील उपजिल्हा रुग्णालय हे तालुक्यातील रुग्णांसाठी वैद्यकीय सेवेचे मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. अपघात ग्रस्त रुग्ण, प्रस्तुतीसाठी येणाऱ्या माता, आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना अनेकदा आपत्कालीन परिस्थिती मध्ये रक्ताची आवश्यकता भासते. मात्र उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र व सुसज्ज रक्तपेढी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालय व इतर खाजगी रक्त पेढ्यांवर अवलंबून राहावे लागते. हक्काची रक्तपेढी नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा बराच वेळ रक्त शोधण्यासाठी वाया जातो, असे निवेदनात म्हटले आहे. या सर्व बाबींचा विचार करून रुग्णांच्या सेवेसाठी उपजिल्हा रुग्णालयात हक्काची रक्तपेढी सुरू करावी, अशी मागणी राहुल चवरे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली असून निवेदनाच्या प्रती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा शल्य चिकित्सक, उपसंचालक आरोग्य विभाग अकोला यांना पाठविल्याआहे .