खातेदारांच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहणे हाच राजर्षी शाहू परिवाराचा संस्कार : संदिपदादा शेळके* अपघाती निधन झालेल्या खातेदाराच्या कुटुंबाला ₹२ लाखांची विमा मदत

खातेदारांच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहणे हाच राजर्षी शाहू परिवाराचा संस्कार : संदिपदादा शेळके
* अपघाती निधन झालेल्या खातेदाराच्या कुटुंबाला ₹२ लाखांची विमा मदत
राजूर : (एशिया मंच न्यूज)                    भोकरदन तालुक्यातील राजूर येथील राजर्षी शाहू परिवाराचे खातेदार स्व. शेख अजीम शेख नूर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या कठीण प्रसंगी राजर्षी शाहू परिवाराने त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत सामाजिक बांधिलकी जपली.
     “खातेदारांच्या सुख-दुःखात त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संदिपदादा शेळके यांनी केले.

        खातेदारांचे भविष्य सुरक्षित राहावे आणि त्यांच्या पश्चात कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने राजर्षी शाहू संस्थेमार्फत खातेदारांचा अपघाती विमा काढण्यात येतो. याच विमा योजनेअंतर्गत स्व. शेख अजीम शेख नूर यांच्या पत्नी श्रीमती रुबीनाताई अजीम शेख यांना ₹२ लाखांची विमा मदत रक्कम मंजूर करण्यात आली. या मदतीचा धनादेश त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

       यावेळी संदिपदादा शेळके म्हणाले की, या आर्थिक मदतीमुळे कुटुंबाचे दुःख कमी होणार नसले, तरी कठीण काळात ‘राजर्षी शाहू परिवार आपल्या सोबत आहे’ हा विश्वास निश्चितच कुटुंबाला बळ देईल. खातेदारांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद असून, त्यांच्या कुटुंबाच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच संस्थेची सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

      यावेळी स्थानिक संचालक तथा राजूर नगरीचे सरपंच भाऊसाहेब भुजंग, रामकृष्ण पारवे, चेतन शेठ अग्रवाल, नानासाहेब ढाकणे, दशरथ बाबा शेळके, विश्वंभर ढाकणे, गणपती संस्थानचे पुजारी दत्तात्रय साबळे, गोविंद दरक, गणेश खरात, पत्रकार बाळासाहेब बोर्डे, आप्पासाहेब पुंगळे, दिनकर थोटे, पिंपळगाव थोटेचे सरपंच सचिन थोटे, आप्पासाहेब थोटे, उमरखेडाचे माजी सरपंच राजू होलगे, पंढरीनाथ ठोंबरे, पळसखेड ठोंबरेचे सरपंच भगवान ठोंबरे, चांधई एक्को गावचे पोलीस पाटील दादाराव पवार, अनिल तळेकर, कृष्णा मुरकुटे यांच्यासह संस्थेचे विभागीय व्यवस्थापक भास्कर जाधव, शाखा व्यवस्थापक कृष्णा कड, गणेश तायडे, गजानन लहाने तसेच संस्थेचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

       खातेदारांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुख-दुःखात सोबत राहणे हीच आमची सामाजिक बांधिलकी, असा संदेश यावेळी देण्यात आला.