* पुणे येथील सत्यशोधक परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी हंटर शिक्षण आयोगासमोर शिक्षणाच्या प्रसाराबाबत मांडणी करून प्रचलित झिरपता सिद्धांताला आव्हान दिले. शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची भूमिका मांडली. मात्र, आज शिक्षणाचे वाढते बाजारीकरण होत असून ही चिंतेची बाब आहे, अशी खंत प्रसिद्ध चित्रपट निर्माता सुनील शेळके यांनी व्यक्त केली.
विद्येचे माहेरघर पुणे येथे आयोजित सत्यशोधक परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना सुनील शेळके यांनी महात्मा फुले यांच्या शैक्षणिक विचारांचा ऐतिहासिक आणि वर्तमानकालीन संदर्भ अधोरेखित केला. महापुरुषांच्या जयंत्या केवळ इव्हेंटपुरत्या मर्यादित राहू नयेत; त्यांच्या विचारांचा स्वीकार करून ते प्रत्यक्ष कृतीत उतरवले पाहिजेत, असा संदेश त्यांनी दिला.
