बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठक मध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी अग्रीम रक्कम म्हणून 5 हजार रुपये देण्याची मोठी घोषणा करण्यात आली परंतु 5 हजार रुपयात शेतकऱ्याच्या घरचा किराणा तरी येईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला शेतकऱ्यांची अशी क्रूर थट्टा करून तुम्हाला काय मिळेल, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी विचारला आहे. एवढं मोठ दुष्काळाचं सावट माझ्या शेतकरी बापवर आलं आहे. सध्या शेतकरी आत्महत्याच्या उंबरंड्यावर उभा आहे आणि सरकार शेतकऱ्यांना मदत करणे सोडून शेतकऱ्यांची थट्टा करते, ही राज्य शासनाला काही तरी अकलेचे तारे तुटले पाहिजे. अशी अपेक्षा करीत या सरकारने शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्यावी, अन्यथा येणारी दिवाळी मंत्र्याच्या घरी चटणी भाकर खाऊन साजरी करू असा इशारा अमोल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
