दुष्काळाच्या संकटाला एकजुटीने हरवू - सुनील शेळके
* म्हसला बु. येथील शेतकरी संवाद ठरला महत्वपूर्ण

बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
           अभिता कंपनीचे सीईओ सुनिल शेळके यांनी तालुक्यातील म्हसला बु. येथे शेतकरी बांधवांसोबत संवाद साधला. दुष्काळी परिस्थिती, रब्बी हंगामाचे नियोजन, भविष्यात उद्भवू शकणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच अभिता ऍग्रो इंडस्ट्रीजच्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर चर्चा केली. 

       जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून बळीराजा संकटात सापडला आहे. सिंचन, जनावरांचा चारा, रब्बीची पेरणी, पिण्याचे पाणी अशा समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. या संकट समयी शेती, माती आणि नाती जपणाऱ्या अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी बळीराजाला दिलासा दिला. वेळ थांबत नाही, हे संकटही दूर होईल. आपण एकजुटीने दुष्काळाचा सामना करू, हतबल होऊ नका. अभिता ऍग्रो इंडस्ट्रीज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही साहेबांनी दिली. 
          शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि शेतीसमोरील आव्हाने जाणून घेतल्या. शाश्वत शेती आणि ग्रामीण विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला.