तरुणावर चाकूहल्ला; दोघांविरुध्द गुन्हा

तरुणावर चाकूहल्ला; दोघांविरुध्द गुन्हा 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      एका २८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी येथील पेंटर गल्ली परिसरात घडली. याप्रकरणी दोन जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
स्थानिक जिजामाता प्रेक्षागारमध्ये गिफ्ट सेंटर चालवणारा गौरव उर्फ गोलू चिंचोले १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पेंटर गल्ली परिसरातून जात होता.             यावेळी आरोपी करण उर्फ मुन्ना मायकल शाम पैठणे आणि सुनील उर्फ लेमन संजय काळे रा. वार्ड क्र. २, भीमनगर बुलढाणा यांनी गौरवला विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केली. या दरम्यान आरोपी करण याने चाकूने गौरवच्या पोटावर आणि पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच गौरवच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला तातडीने प्रथम शासकीय रुग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी शहरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. सध्या गौरववर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी फिर्यादी वडील गजानन चिंचोले यांच्या तोंडी रिपोर्टवरून शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.