* शिरपुरात बैलपोळा ; एकत्र कुटुंबाचा आदर्श वस्तुपाठ
बुलढाणा : ( एशिया मंच टीम )
शेती आणि मातीशी कायम नाळ जुळलेल्या शेळके कुटुंबीयांनी मूळगाव शिरपूर येथे एकत्रित बैलपोळा साजरा केला. वर्षभर शेतात राबणाऱ्या वृषभराजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. बाबा, आई, साहेब, ताई, दादा आणि मालतीताई यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा घास भरवला.
सहकार, समाजकारण, राजकारण, उद्योग, शिक्षण यासह इतर क्षेत्रात सक्रिय शेळके परिवार नेहमीच सण, उत्सव साजरा करतांना दिसतो. तसं तर कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल्या कामात व्यस्त असतात. स्वेच्छानिवृत्तीनंतर साहेब उद्योग, चित्रपट निर्मितीकडे पूर्णवेळ लक्ष देत आहेत. समाजकारण, राजकारण ताईंचा श्वास आहे. दादा उद्योग, समाजकारण, राजकारणात बिझी असतात. मालतीताईंनी पूर्णवेळ बँकिंगवर फोकस करीत आपली वेगळी इमेज निर्माण केली आहे. सर्वांच्या मार्गदर्शक भूमिकेत बाबा सक्रिय आहेत. वयाच्या जवळपास ८५ मध्ये तिसरा, चौथा मजला चढून दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवतात. जिल्हाभर दौरे सुद्धा करतात अन उरलं-सुरलं शेतीत फेरफटकाही असतोच. तसं पाहिलं तर शेळके कुटुंबात बाबांना सर्वात यंग म्हटलं पाहिजे. एवढी सकारात्मक एनर्जी त्यांच्याकडे आहे. आईचे त्याकाळी डीएड झालेले आहे म्हटल्यावर कुटुंबाच्या खऱ्या हेडमास्तर आईच आहेत. घरातील प्रत्येक सदस्य आज आयडॉल आहे म्हणजे आईचेच संस्कार आहेत. शिरपूर येथील बैलपोळा सणाच्या फोटोत शेळके कुटुंबातील सर्वच सदस्य आहेत. धावपळ, दगदग, प्रपंच सगळ्यांनाच असतो. तरीही त्यातून आपल्या माणसांसाठी वेळ काढावा लागतो. सण, उत्सव त्यासाठीचे एक माध्यम आहे. आदर्श कुटुंब कसे असावे याचे आदर्श उदाहरण यापेक्षा दुसरे कुठले असू शकते.....
