* बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयात झाली गणरायाची स्थापना
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
येथील बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेत बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेश मंडळाने आज १४ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाचे स्वागत केले. यंदाचे हे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने आणि दुष्काळग्रस्त परिस्थित पाहता मंडळाच्या वतीने मर्यादित स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर 14 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बुलडाणा अर्बन कर्मचारी मंडळाच्या वतीने गणरायाचे आगमन झाले संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांच्या शुभहस्ते गणरायाचे विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी गणरायाची आरती बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे सरव्यवस्थापक कैलास कासट, बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व कार्यकारिणी मुख्यालयातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या श्रध्देने सहभागी झाले होते.
* बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा आकर्षक देखावा...
बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेश मंडळाचा देखावा साजरा केला जातो. यंदा देखील सुंदर असा देखावा उभा करण्यात आला. अतिशय सूक्ष्म आणि आकर्षक अशी मांडणी या देखाव्याची करण्यात आली आहे. बाजारपेठेत खरेदी करीता येणारे नागरिक मोठ्या उत्सुकतेने या आकर्षक देखाव्याची पाहणी करीत असतात.
