राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या मुख्यालयी गणरायाची प्रतिष्ठापना * शेतकऱ्यांच्या सुख, समृद्धीसाठी विघ्नहर्त्याचरणी प्रार्थना

राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या मुख्यालयी गणरायाची प्रतिष्ठापना 
* शेतकऱ्यांच्या सुख, समृद्धीसाठी विघ्नहर्त्याचरणी प्रार्थना
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या कारंजा चौकातील मुख्यालयी आज श्री गणरायाचे मंगलमय वातावरणात आगमन झाले. राजर्षी शाहू परिवाराचे आधारवड, संस्थापक अध्यक्ष रा. ल. उपाख्य भाऊसाहेब शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

        संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके, गार्गी यांच्या हस्ते श्री गणरायाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी भक्तिभावाने श्री गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या मंगलमयप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विजय महाजन, संचालक राम अण्णा लोखंडे, बाळूभाऊ भराड, संदिप बांबल, दत्ता जाधव, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी वृंद आणि राजर्षी शाहू परिवाराचे सदस्य उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी येवो यासाठी विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.