* 735 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ
लोणार : (एशिया मंच न्यूज )
येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बरकत फाऊंडेशनच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल, जामा मस्जिद चौक, लोणार येथे मोफत महा-ID कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
13 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसामुळे स्थगित झालेले हे शिबिर 14 सप्टेंबर 2026 रोजी सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 या वेळेत घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या एकाच दिवसाच्या शिबिरात एकूण 735 लोकांची मोफत नोंदणी करण्यात आली आहे.
शिबिराचे उद्घाटन इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल, सेक्रेटरी हाजी महेमूद शेठ, तर इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल चे अध्यक्ष अब्दुल गफार कुरेशी, सदस्य अब्दुल कादर कुरेशी यांनी केले तर शिबिराला प्रमुख उपस्थीती शिवसेना शिंदे गट बुलढाणा जिल्हा प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रा.बळीराम मापारी, नगर सेवक भूषण मापारी, नगर उपाध्यक्ष आबेद खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तोफिक सेठ कुरेशी, नितीन शिंदे, नगर सेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत मापारी, आरोग्य सभापती अब्दुल उबेद , नगर सेवक संतोष मापारी, नगर सेवक गुलाब भाई सरदार, नगर सेवक गजानन मापारी, नगर सेवक शेख जावेद, नगर सेवक नंदकिशोर इंगळे, शेख करामत शेख गुलाब, ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, साहेबराव पाटोळे, इम्रान खान, एड. खिजर अली, शिवसेना नेते लुकमान कुरेशी, पत्रकार शेख उबेद कुरेशी, राहुल सरदार, अशोक इंगळे, शेख निसार, आमेर अली सर, शेख रफिक , मिस्कीन कुरेशी, विकास मोरे ,शेख जावेद , शेख समीर, इकबाल भाई, शेख नदीम सर, शेख फइम सर यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
लोणार शहर व परिसरातील नागरिकांनी सकाळपासूनच नोंदणीसाठी मोठी गर्दी केली होती. बरकत फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने शिबिराचे नियोजन केले होते. यावेळी बरकत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशपाक परसुवाले, उपाध्यक्ष शेख अझर, सचिव शेख सज्जाद, सह सचिव साहिल खान, कोषाध्यक्ष शेख मुजफ्फर, सदस्य सय्यद वसीम, सदस्य सुभान भाई परसुवाले, शेख इर्शाद, शरीझ अली, रिझवान कुरैशी ,जिशान कुरैशी ,शेख वाजिद पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही अशाच प्रकारचे लोकोपयोगी उपक्रम राबवले जातील, अशी माहिती फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली.
