साहेबांनी केले 'साहेबां'चे अभिनंदन !* जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.शिंगणे यांचा सुनील शेळके यांनी केला सत्कार

साहेबांनी केले 'साहेबां'चे अभिनंदन !
* जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.शिंगणे यांचा सुनील शेळके यांनी केला सत्कार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिता कंपनीचे सीईओ तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांनी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. 

         जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची 'साहेब' अशी ओळख आहे. सहकार आणि राजकारणात त्यांचे वजन आहे. शिंगणे साहेबांचा शब्द इतर राजकारणी मंडळी सुद्धा खाली पडू देत नाहीत. याचा वेळोवेळी प्रत्यय येतो. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि जिल्ह्याचा विकासासाठी डॉ. शिंगणे यांनी जिल्हा बँकेत सर्वपक्षीय मोट बांधली. त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीचा जिल्ह्यात जल्लोष करण्यात झाला. सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. 
      प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेले माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांनी भेट घेऊन सत्कार केला. सुनील शेळके यांनाही आदराने साहेब म्हणतात. डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेबांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीची नवी दिशा अधिक भक्कम होवो, अशी सदिच्छा शेळके यांनी व्यक्त केली.