राजे छत्रपती महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळ व तत्वज्ञान अभ्यास मंडळाचे उद्घाटन

राजे छत्रपती महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळ व तत्वज्ञान अभ्यास मंडळाचे उद्घाटन 
 धामणगाव बढे : (एशिया मंच न्यूज )
           स्थानिक राजे छत्रपती महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र अभ्यास मंडळ व तत्वज्ञान अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून से. नि.शिक्षणाधिकारी रामभाऊ जुमडे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. उमेश दैवे सर उपस्थित होते. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. उमेश दैवे सर म्हणाले की,  राज्यशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांच्या जीवनातील अमुलाग्र बदल घडू शकतो. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत पास व्हायचं असेल तर राज्यशास्त्र हा विषय अत्यंत आवश्यक आहे. पोलीस भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन एमपीएससी यूपीएससी अशा महत्त्वाच्या परीक्षेमध्ये राज्यशास्त्र या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास केला तर कोणतेही शासकीय महत्त्वाचे पद विद्यार्थी मिळवू शकतो.          यावेळी बोलताना जुमडे सर म्हणाले की, व्यक्तीने जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये सद्भावना आणि चांगल्या गुणांना नेहमी स्थान दिले पाहिजे चांगले तत्वज्ञान हे मानवी जीवनाला चांगल्या उंचीवर येऊ शकते. त्यामुळे जीवन जगत असताना मनुष्य ज्याप्रमाणे राजकीय व्यवस्थेचा भाग असतो त्याचप्रमाणे जीवन जगत असताना कोणत्या ना कोणत्या तत्त्वावर आपले जीवन जगत असतो. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अविनाश मेश्राम होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भगवान गरुडे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मानवी कोठाळे यांनी केले.  कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.