चिखली : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील रहिवासी सौ. लताबाई लहुजी गावंडे यांचे २० सप्टेंबर २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम बुधवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. अध्यात्माची त्यांना विशेष आवड होती. त्यांच्या निधनाने गाव परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्टांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्याप्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिवंगत सौ. लताबाई गावंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
