प्राजक्ता पुरी बनल्या उर्दू शिक्षिका
* पलसिद्ध अर्बन परिवाराच्या वतीने सत्कार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील कोलवड येथील प्राजक्ता योगेश गिरी (प्राजक्ता संतोष पुरी) यांची बुलढाणा नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या उर्दू प्राथमिक शाळेवर उर्दू शिक्षिका या पदावर निवड झालेली आहे.
पलसिद्ध अर्बन परिवार नेहमीच ग्रामीण भागातील तरुणी व तरुणांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून २० सप्टेंबर २०२६ रोजी पलसिद्ध अर्बनच्या तिसऱ्या आमसभेत प्राजक्ता योगेश गिरी यांचा शाल, गुच्छ, व शिवराज्याभिषेक प्रतिमा देऊन संस्थेचे अध्यक्ष कौतिकराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी योगेश गिरी, दत्ता गिरी, सचिन खरे, रवी खराटे, जिवन शेळके, अनिल खोलगडे, प्रवीण ढोन व इतर सभासद बांधव हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन खरे तसेच आभार प्रदर्शन रवी खराटे यांनी केले.
