* बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे आयोजन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळ आयोजित आणि मेलडी मेकर्स, अमरावती द्वारा प्रस्तुत 'सुनहरे पल' या हिंदी-मराठी गीतांच्या सुमधुर कार्यक्रमाला बुलडाणा शहरातील कर्मचारी व दर्दी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमाची सुरुवात बुलडाणा अर्बन संस्थेच्या गोवर्धन इमारती मधील सभागृहात संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर व सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या शुभहस्ते भारतमातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी डॉ. झंवर व कासट यांनी सहभागी गायक कलाकारांचा मोमेंटो देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेन राजपूत आणि चंद्रशेखर जोशी यांनी केले.
सुरुवातीला अरुण देशपांडे, मंगेश बनसोड व निलेश बनसोडकर यांनी 'हमसे बढकर कौन' मधील 'देवा हो देवा गणपती देवा...' या गीताने जबरदस्त सुरुवात केली. विजय डोईफोडे यांनी 'पुकारता चला हूँ मैं...', यशवंत राजे यांनी '1942 अ लव्ह स्टोरी' मधील 'कुछ ना कहो...', विजय जांभुकर यांनी 'याराना' मधील 'छू कर मेरे मन को...' सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. चंद्रशेखर जोशी यांच्या गणपती गीताला वाहवा मिळाली, तर अरुण देशपांडे व मंगेश बनसोड यांच्या 'जग में सुंदर है दो नाम...' या गीताने सभागृह भक्तीमय झाले. मनीषा दलाल यांनी 'उंबरठा' मधील 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...', अविनाश गुल्हाने यांनी 'चितचोर' मधील 'आज से पहले...', शिरीष देशपांडे यांनी 'ब्लॅकमेल' मधील 'पल पल दिल के पास...', भगवान लोखंडे यांनी 'सुनयना' मधील 'आ इन नजारों को...' सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
राजेंद्र वानेरे यांचे 'पर्वतों से आज मैं टकरा गया...', संध्या निनावे यांचे 'दिल दिवाना बिन सजना के...', निलेश गव्हाळे यांचे 'तू मिले दिल खिले...', अजिंक्य पाटील यांचे 'और इस दिल में क्या रखा है...', मंगेश बनसोड यांचे 'मैं आवारा एक बंजारा...' याला प्रेक्षकांनी 'वन्स मोअर' देत नृत्याचा आनंद लुटला. संजय कुलकर्णी यांचे 'चाँद आहें भरेगा...', राजेश तायडे यांचे 'मैं जट यमला पगला दिवाना...', अरुण देशपांडे यांचे 'कोई रोको ना दिवाने को...', सुनील जाधव यांचे 'सुन बेलिया शुक्रिया...', मनीष राऊत यांचे 'जब कोई बात बिगड जाए...', अरविंद यांचे 'बडी मुश्किल है...', गोपाल यांचे 'सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं...', सौ. लिना यांचे 'डॉन' मधील 'ये मेरा दिल प्यार का दिवाना...', प्रशांत काळवाघे यांचे 'हमें और जीने की चाहत ना होती...', प्रताप तेलंग यांचे 'भोले ओ भोले...' तर प्रतिक्षा भालेराव यांचे 'झाल्या तिन्ही सांजा...' व 'गोंधळ आई भवानीचा...' या गीतांनी मैफल रंगत गेली. कार्यक्रमाचे आभार संजय कुलकर्णी यांनी मानले.
* भावपूर्ण श्रद्धांजली :
कार्यक्रमा दरम्यान बुलडाणा अर्बनचे दिवंगत कर्मचारी कैलास मिश्रा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. निलेश बनसोडकर यांनी 'साथी' मधील 'याराना यार का ना कभी टूटेगा...' हे गीत स्व. कैलास मिश्रा यांना समर्पित केले. गीत संपताच मित्राच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले, यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांना सावरले. हा भावपुर्ण क्षण पाहताच संपूर्ण सभागृह हेलावून गेले होते.
