विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ चिखलीत काँग्रेसचे आक्रमक आंदोलन
* लोकशाहीचा गळा घोटणारे मोदी सरकार उलटून टाकू
चिखली : (एशिया मंच न्यूज )
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसनेते खा.राहुलजी गांधी यांच्याशी पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ चिखलीत लोकनेते राहुल भाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी 23 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. आगामी काळात लोकशाहीचा गळा घोटणारे मोदी सरकार उलथून टाकू, असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.
यावेळी आंदोलकांनी विद्यार्थ्यांचा आवाज दडपणारे सरकार हाय हाय, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सत्तेचा निषेध असो, विद्यार्थ्यांवरील अत्याचार बंद करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या घटनात्मक अधिकारावर दडपशाही करून लाठीचार्ज करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनादरम्यान केंद्र सरकारवर लोकशाही मूल्यांची पायमल्ली केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे असंवैधानिक असल्याची टीका करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील कारवाईची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून अन्यायाविरोधातील लढा यापुढेही अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी नगर परिषद विरोधी पक्षनेते डाॅ. मोहमंद इसरार, बाजार समितीचे सभापती समाधान सुपेकर, भाई प्रदिप अंभोरे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष जाकीर शेख, किसान काँग्रेसचे समाधान आकळ, प्रदिप पचेरवाल, शिवराज पाटील, नगरसेवक गोपाल देव्हडे, गोकुळ शिगणे, पुरूषोत्तम वायाळ सर, उबेद अली खान, डाॅ. अमोल लहाने, रत्नदिप शिनगारे, संतोष देशमुख, जक्काभाई, आनंद बोेंद्रे, प्रषांत भटकर, खलील बागवान, सचिन शेटे, मो.सोहिल आसिफ भाई, दत्ता करवंदे, रोहन पाटील, पवन गवारे, गजानन डुकरे, शिवनारायण म्हस्के, नजिरसेठ कुरेषी, सिध्देष्वर परीहार, गणेश जवंजाळ, डाॅ. रविंद्र कमळस्कर, भास्कर चांदोरे, लक्ष्मण भिसे, भिकाभाउ शेटे, संजय गिरी, प्रकाश राठोड, शेख अज्जु, सागर साळवे, प्रमोद साळवे, रवि लोखंडे, रोहन पाटील, सुरेश गुंजकर, अखिल खान, नितीन वाघ, राहुल चवरे, राजीक खान, मो. शकील भाई, शेषराव पाटील, नासेर सौदागर, भगवान गायकवाड, दिलीप खंदलकर, अशोक झगरे, असलम पठाण, अमोल मोरे, शेख हादी, रविंद्र सोनटक्के, समिर खान, भारत पाटील, शेख करीम, यासिन खान, बबलु शेख, शेख अजिस, सोहिल शेख, अनवर शेख, सचिन बडगे, सदुनाना ठेंग, करीम शेख, तरबेज खान, यासिन शेख, सोहील शेख, कैलास जंगले, भगवानअप्पा राजमाने, अयान जमदार, गोेपाल गायकवाड, बंटी सुरडकर, सौरभ पवार, मयुर शिनगारे, आयान जमदार, शरद पाटील, जाहेद खान, मुकेष खरात, शेख शमीम, सोहिल शेख, अयान कुरेशि, रिजवान शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कु. तनवी सचिन शेटे, कु. गायत्री राजेश देशमुख या विद्यार्थींनी सह अनेक विद्याथ्र्यांनी आपला सहभाग नोंदविला.
