जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती अमरे यांची शिवसाई शाळेत मुलाखत * शिवसाई युनिव्हर्सल ज्ञानपीठ स्कूल कोलवड

जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती अमरे  यांची शिवसाई शाळेत मुलाखत 
* शिवसाई युनिव्हर्सल ज्ञानपीठ स्कूल कोलवड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर सुवर्णपदक विजेत्या भक्ती अमरे यांची मुलाखत  २० जुलै २०२६ रोजी 
दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतली.  
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी शिवसाई युनिव्हर्सल ज्ञानपीठ स्कूल, कोलवड, जि. बुलढाणा येथे महान व्यक्तिमत्त्व मुलाखत या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी तथा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर सुवर्णपदक विजेत्या श्रीमती भक्ती अमरे उपस्थित होत्या.
          इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी श्रीमती अमरे यांची प्रभावी मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रवास, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अनुभव, यशामागील कठोर परिश्रम, वेळेचे नियोजन, शिस्त आणि आत्मविश्वास याविषयी विविध प्रश्न विचारले.  श्रीमती अमरे यांनी प्रत्येक प्रश्नाला मनमोकळेपणाने उत्तरे देत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा, सातत्याने मेहनत करण्याचा आणि क्रीडा क्षेत्रात करिअर घडविण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. या मुलाखतीसाठी कल्पना देवकर, पुष्पा गायकवाड काळे, सागर उबाळे यांनी यशस्वी आयोजन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने, प्रभावीपणे अमरे मॅडम यांची यशस्वी मुलाखत घेतली.
        सदर मुलाखत उपक्रम ही शाळेचे अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येते, ज्याचा उद्देश की विद्यार्थी व शिक्षकांना मुलाखत देण्यासाठी आलेल्या मान्यवर कडून विविध अनुभव व प्रेरणा मिळणे. करिता शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद मोहरकर सर नियमित सदर मुलाखत बाबत पाठपुरावा करत असतात जेणेकरून विद्यार्थी व शिक्षक अद्यावत होण्यास मदत होईल. आजच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी चालना मिळाली. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.