* पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे : जालिंदर बुधवत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व गजानन वाघ यांनी संयुक्तरीत्या केले आहे.
येत्या २७ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रुग्णांना फळवाटप , विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, गरजूंसाठी अन्नदान यासारखे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत व गजानन वाघ यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
* बुलढाणा येथे विविध कार्यक्रम.....
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ जुलै रोजी बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षारोपण व शेतकऱ्यांना मोफत वृक्ष वाटप, जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप , २६ जुलै सकाळी ८.३०
बुलढाणा येथील जगदंबा देवीला पातळ चढवून महाआरती , सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप , नंतर मूकबधिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व खाऊ वाटप करण्यात येईल. त्यानंतर
गर्दे सभागृह बुलढाणा येथे रक्तदान शिबिर व कार्यकर्ता मेळावा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सायंकाळी सेवा संकल्प आश्रम पळसखेड येथे अनाथ निराधार बांधवांना स्नेहभोजन होतील. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे.
