* जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मोहेगांव व खैरखंड येथील विद्यार्थी सुमारे 120 ते 130 विद्यार्थी दररोज बुलढाणा शहरातील विविध शाळांमध्ये शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या बसेसवर अवलंबुन आहेत. मोहेगांव हे बुलढाणाकडे येण्यासाठी मार्गावरील शेवटचे थांबे असल्याने सकाळच्या वेळेत बुलढाण्याकडे जाणाऱ्या बहुतेक एस.टी. बस ह्या पुर्वीच्या थांब्यावरुनच मोठ्या प्रमाणात प्रवासीने भरलेल्या असल्याने मोहेगांव येथून विद्यार्थ्यांना बस मध्ये प्रवेश मिळत नाही, मोहेगांव येथे शाळेच्या वेळेत जाणाऱ्या एस.टी. बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी विलंब होत, असल्याने परिणामी शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता यावे यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र एस.टी. बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी चेतन राठोड यांनी आज 22 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापुर ते बुलढाणा मार्गावरील सकाळच्या वेळेतील वाढती प्रवासी व विद्यार्थी संख्या विचारात घेवून एस.टी.बस सेवेच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात. जेणेकरून मोहेगाव येथील विद्यार्थ्यांना बुलढाणा येथे येण्यासाठी सोईचे होईल. तसेच सकाळी सुमारे 6.20 वाजता उपलब्ध असलेल्या उबाळखेड- बुलढाणा बसचा लाभ घेण्यासाठी मोहेगांव व खैरखेड येथील लहान विद्यार्थ्यांना खडकी फाटा येथे सुमारे 1 कि.मी. पायी चालून बसची प्रतिक्षा करावी लागते. सदर बस ही या मोहेगाव फाट्याच्या आधीच्या थांब्यावरून प्रवाशांनी भरलेली असल्याने विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागतो. तरी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी विशेष लक्ष देत वरील परिस्थीतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मोहेगांव फाटा येथे जलद, अति जलद बस थांबा मंजुर करण्यात यावा, जेणे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी रास्त मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर चेतन प्रेमसिंग राठोड यांची स्वाक्षरी आहे.
