मोताळा : (एशिया मंच न्यूज )
कमिन्स इंडिया प्रा.लि. या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल पूजा विनोद सावळे हिचा अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी सत्कार केला.
येथील पूजा विनोद सावळे हिने पुणे येथील डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे येथून बी.ई. (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आता तिची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली. पूजाला मिळालेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल मा.उपजिल्हाधिकारी सुनिल शेळके यांनी अभिनंदन केले. तसेच उज्ज्वल व यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
