प्रत्येकाने मनातला पँथर जागवावा - सुनील शेळके

प्रत्येकाने मनातला पँथर जागवावा - सुनील शेळके 
मोताळा : (एशिया मंच न्यूज )
        समाजातील प्रत्येकाच्या मनात पँथर दडलेला असून त्याला जागवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अभिता कंपनीचे सीईओ तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांनी केले.
         ब्ल्यू पँथर सेना या संघटनेचा पहिला वर्धापन दिन सोहळा २० जुलै रोजी मोताळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. ब्ल्यू पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष
भाई निळकंठ वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना शेळके म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपत ब्लू पँथर संघटनेने भविष्यातही जनहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे. समाजातील वंचित, पीडित आणि गरजू घटकांच्या न्याय व हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. 
 ब्ल्यू पँथर सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.