भिमकन्यानी आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला दिले समर्थन

भिमकन्यानी आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला दिले समर्थन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          शिक्षण हे वाघीनी चे दूध आहे, जो पेइल तो गुरगुरेल, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आणि तशी तरतूद संविधानात असून  प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु काही वर्षा पासून सात्यात्याने शिक्षणाचे बाजरीकरण होत आहे. वारंवार पेपर फुटीचे प्रकार घडले.  परिणामी 20-30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. परंतु या देशात कोणीच यांची जबाबदारी घेतली नाही,
 म्हणून cjp ने एक देशव्यापी आंदोलन उभं केले ,  तसेच विविध पुरस्कार प्राप्त सोनम वांगचूक यांनी या युवा आंदोलनाला समर्थन करून या  ढासलेल्या आणि भ्रष्ट शिक्षण व्यवस्थे विरुद्ध अमरण उपोषण सुरु केले.  हे आंदोलन अधिक प्रभावी होत व्यापक होऊन संपूर्ण देशात युवा वर्ग रस्त्यावर उतरले. संपूर्ण भारत भर जोरदार आंदोलन सुरु आहे, त्यात रमाईच्या लेकी ग्रुप, क्रांती ज्योती स्वयं साह्यता बचत गट, यशसिद्धी सैनिक सेवा महिला संघ, वसुंधरा सेवेच्या शेकडो महिलांनी बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने समर्थन देत  20 जुलै रोजी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ काळ्या फिता बांधून निषेध नोंदविला.
       जिल्हाधिकारी यांच्या मार्फत  राष्ट्रपती यांना निवेदनातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. येणाऱ्या पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी आधुनिक हिरकणी या मैदानात उतरल्या. पेपर लीक विरोधी आंदोलक सोनम वांगचूक, अभिजित दिपके, नेहा बोरा यांना समर्थन देण्यासाठी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी मातोश्री रमाई च्या लेकीं ग्रुपच्या संयोजिका ज्योती अनिल डोंगरदिवे, मुख्य आयोजिका अस्मिता मनवर, सुषमा हिवाळे, मनीषा जाधव, प्रज्ञा भंडारे, साधना गवई, विद्या मिसाळ, सुनंदा खंडाळे, छाया सरकटे, आशा खिल्लारे, सुशीला गवई, सुनीता गवई, सुजाता हिवाळे, सुनीता जाधव, वैशाली सुखदाणे, सुशीला वानखडे, मनीषा बोर्डे, उषा लहाने, सुनीता गवई, आशा इंगळे, पूनम आराख, जया घेवंन्दे , वर्षा ताई, वैशाली धंदर, सुनीता गवई, नीता साळवे, सुकेशनी ठाकरे, वैशाली घेवंदे , सुनीता डोंगरदिवे, वर्षा कासरे, सीमा सरदार, वाघ ताई, साजेदा बेगम, निमा आफ्रिन, सिदा आफ्रिन, मनोज भालेराव, प्रदीप मोरे, शीतल सोनुने,  स्वाती काटकर, प्रतिभा भुतेकर, प्रज्ञा लांजेवार, मंजू जाधव, कस्तुरे ताई आदी महिलांनी सक्रिय सहभाग घेतला.