अभिता कंपनीच्या सीईओंनी केला वंशिकाचा सत्कार

अभिता कंपनीच्या सीईओंनी केला वंशिकाचा सत्कार
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
         येथील वंशिका नीलेश पाटील हिने फॅशन टेक्नॉलॉजी(एनआयएफटी) प्रवेश परीक्षेत घव लाघव वीत यश मिळवल्याबद्दल अभिता कंपनीचे सीईओ तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांनी तिचा सत्कार केला.

         बुलडाणा येथील नीलेश पाटील व भावनाताई पाटील यांची कन्या वंशिका हिने एनआयएफटी प्रवेश परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर ७१ वा क्रमांक मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
पारंपरिक वाटेऐवजी स्वतःची वेगळी वाट निवडत, अथक परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने हे दैदिप्यमान यश संपादन केले. तिचे हे यश प्रेरणादायी असून, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, याचे ती उत्तम उदाहरण ठरली आहे.