नाशिक-ओझर येथे शब्दांच्या पलीकडे काव्य संमेलन * ज्येष्ठ पत्रकार कवी संजय निकाळजे यांचा सहभाग

नाशिक-ओझर येथे शब्दांच्या पलीकडे काव्य संमेलन 
* ज्येष्ठ पत्रकार कवी संजय निकाळजे यांचा सहभाग 
चिखली :  (एशिया मंच न्यूज )
             नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे 'शब्दांच्या पलीकडे' काव्य संमेलनाचे आयोजन रविवार ३० ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या कवी संमेलनात ज्येष्ठ पत्रकार कवी संजय कलाईनाथा निकाळजे यांचा सहभाग राहणार आहे. असे मुख्य आयोजकांनी त्यांना कळविले आहे. 
बीएसएफ बहुउद्देशीय संस्था व संत कबीर बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे काव्य संमेलन 'आजीचं पुस्तकांच हॉटेल' या आगळ्या-वेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या काव्य संमेलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या कोलारा ह्या एका छोट्याशा खेड्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा कवी गायक संजय कलाईनाथा निकाळजे यांचा सहभाग राहणार आहे. यासंदर्भात सदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व या काव्य समेलनाचे आयोजक भूषण सरदार यांनी तसे त्यांना कळविले आहे. कवी संजय निकाळजे हे विद्यार्थी दशेपासूनच विविध विषयावर कविता रचना करत असतात. अनेक वृत्तपत्रातून त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित होत असतात. गेल्या काही वर्षापासून महापुरुषांच्या जीवन चरित्रावरील कविता तसेच गीतांची रचना करून त्याचे संगीतमय व प्रबोधनात्मक सादरीकरण व गायन सुद्धा ते तालुका किंवा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर करीत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन उपरोक्त संस्थेने त्यांची या कवी संमेलनासाठी निवड केली आहे. असे त्यांना मुख्य आयोजकांनी कळविले आहे.