गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवर्य डॉ. रामराव महाराज यांना गुरुपौर्णिमे निमित्त अभिवादन

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवर्य डॉ. रामराव महाराज यांना गुरुपौर्णिमे निमित्त अभिवादन 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिर, सेवालाल नगर, सुंदरखेड येथे बंजारा समाजाच्या वतीने समाजाचे धर्मगुरू पूज्य डॉ. रामराव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

        यावेळी व्ही. आर. चव्हाण यांनी गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करत समाजात शिक्षण, संस्कार, सामाजिक एकोपा आणि आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करण्याचे आवाहन केले. संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचा प्रसार करून समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामेश्वर चव्हाण यांनी केले.

      यावेळी कार्यक्रमाला  राजु राठोड नायक, विठ्ठल चव्हाण कारभारी,  रमेश चव्हाण,  रघुनाथ जाधव,  धनसिंग चव्हाण, मोहन राठोड सर,  विष्णुभाऊ जाधव, मुरलीधर चव्हाण, शंकर राठोड, मोहन राठोड (आडे),   रामदास जाधव, दिनकर जाधव, विष्णुभाऊ राठोड, वसंत राठोड,  संजय चव्हाण, शेषराव जाधव, प्रेमदास राठोड, रामेश्वर चव्हाण,  घनशाम चव्हाण, बि.के. चव्हाण,  दयाराम जाधव, संतोष राठोड, पुरूषोत्तम आडे, राहुल चव्हाण, श्रीतेज आडे , सौ. रंजनाताई चव्हाण,  सौ.बेबीताई चव्हाण, सौ. किरन आडे,  सौ. मिराताई चव्हाण यांच्यासह बंजारा समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण होते. शेवटी उपस्थितांनी पूज्य डॉ. रामराव महाराज यांचे आशीर्वाद घेतले आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.