बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव द्या* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुलढाणा जिल्हा रिपाई आठवले गटाचे निवेदनाद्वारे मागणी


बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव द्या
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुलढाणा जिल्हा रिपाई आठवले गटाचे निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          बुलडाणा जिल्ह्याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने प्रा.इंजिनियर भैयासाहेब पाटील, बुलडाणा रिपाइं जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, रिपाइं जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बुलढाणा जिल्हा रिपाई आठवलेंच्या वतीने बुलडाणा जिल्ह्याला राजमाता जिजाऊ नगर तसेच बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भारतरत्न डॉ.आंबेडकर नाव द्या, असे अश्याचे निवेदन देण्यात आले.
         दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, हा जिल्हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उदारी अशा ह्या या महामातेच्या पोटी स्वराज्य संस्थापक सर्वधर्म संभावाचे पालन करते छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या  मातेचे नांव बुलढाणा जिल्ह्याला राजमाता जिजाऊ नगर देण्यात यावे.
        मॉ. जिजाऊचे नाव कोरल्यामुळे शासन दरबारी नोंद होईल व राजमाता जिजाऊ जिल्हा म्हणून सर्वदूर ओळखल्या जाईल, त्यासाठी बुलडाणा जिल्हाचे नामांतर करून राजमाता जिजाऊ नगर करण्यात यावे. त्याच प्रमाणे बुलडाणा येथे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेले आहे. त्या महाविद्यालयास येणाèया भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 139 व्या जयंतीच्या मुहर्तावर त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे, असे निवेदन रिपब्लिकन पार्टीच्या वतीने बुलडाणा जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळ भेटून त्यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.  
    यावेळी बुलढाणा तालुकाध्यक्ष केशवराव सरकटे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा बेग, महाबोधि विहार समितीचे अध्यक्ष जे.पी. वाकोडे, हिम्मराव जाधव, रामभाऊ शिंदे, प्रभाकर जाधव, निरंजन जाधव सर, मोताळा तालुकाध्यक्ष बाळासाहेब आहीरे, रामदास काहाळे, निलेश सिनगारे , विदर्भ महीलाउपाध्यक्षा आशाताई वानखेडे, बुलडाणा तालुकाउपाध्यक्ष इंजिनियर भास्करराव जाधव, रिपाइं नेते राजू हिवाळे, मलकापूर तालुकाध्यक्ष दिलीप इंगळे, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष संतोष वानखडे, बाबूलाल इंगळे, निळकंठ दादा सोनोने, भरत रधंवे, विजय भालमोडे , तेजराव म्हस्के ,सोनोशी उपसरपंच रविंद्र शिंदे, मधुकर शिंदे, पंकज वाघ मेहकर, भाऊसाहेब वानखेडे, रिपाइं जिल्हाउपाध्यक्ष इंजीनियर राजेश सरकटे, कांताबाई जाधव, सुभाष मिसाळ, विजय साबळे, विजय सपकाळ, प्रल्हाद कांबळे, संजय चितळे, दिपक कस्तुरे इत्यादी असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
       मुख्यमंत्री महोदय आमच्या जनभावनेचा आदर करून नक्कीच आमच्या मागण्याचा सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी व्यक्त केली आहे . लवकरच बुलढाणा जिल्हा रिपाई आठवले गटाचे शिष्टमंडळ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार ना.डॉ. रामदासजी आठवले व महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाठ तसेच महाराष्ट राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांना भेटून वरील  मागणी करणार आहे.