मातोश्री येथे पार पडला शिवसेना पक्षप्रवेश सोहळा*बुलडाणा विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मातोश्री येथे पार पडला शिवसेना पक्षप्रवेश सोहळा
*बुलडाणा विधानसभा मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       जिल्ह्यातील मोताळा व बुलडाणा तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे आज 14 मार्च रोजी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मातोश्री येथे आयोजित कार्यक्रमात बुलडाणा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी अधिकृतरित्या पक्षात प्रवेश करत पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. 
        शिवसेना प्रवक्ता ॲड.जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या नेतृत्वात या मोठ्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यातील पक्षाची ताकत वाढली असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

         या पक्षप्रवेशात मोताळा तालुक्यातील अंत्री येथील सरपंच मीराताई कैलास बहादरे, अशोकदादा पाटील (शिक्षण संस्था अध्यक्ष, वडणी चिंचखेड खु.), सुभाषभाऊ रघुनाथ पाटील (ग्रामपंचायत सदस्य, लिहा), अक्षयभाऊ नाईक (ग्राम सदस्य, गिरोली), वैभवभाऊ उखा चव्हाण (सभापती पुत्र, दाभा), सुरेशभाऊ राठोड (माजी ग्रा.पं.सदस्य, निमखेड), काशिनाथभाऊ शामराव बिचकुले (सामाजिक कार्यकर्ता, धा. देशमुख), मुरलीभाऊ सातव (ग्रा.पं.सदस्य, जयपूर), अक्षयभाऊ मधुकर जवरे (सामाजिक कार्यकर्ता, अंत्री), गणेशभाऊ गजानन शेळके (सामाजिक कार्यकर्ता, तिघ्रा ), विजयभाऊ पुंडलिक खराटे (सामाजिक कार्यकर्ता, लिहा), सागरभाऊ मेढे (सामाजिक कार्यकर्ता, परडा), गोपालभाऊ दिवाणे (सामाजिक कार्यकर्ता, शिरवा), मिलिंदभाऊ मनोहर गवई (सामाजिक कार्यकर्ता, चिंचपूर), श्रीकृष्णभाऊ घोंगटे (सामाजिक कार्यकर्ता, आव्हा), भारतभाऊ पांडू राठोड (सामाजिक कार्यकर्ता, नाईकनगर), चेतनभाऊ हिंगे (सामाजिक कार्यकर्ता, मोताळा), मोहन चव्हाण (ग्रा.पं.सदस्य, निमखेड) जयंतभाऊ व्यवहारे पाटील (सामाजिक कार्यकर्ता, योगेशभाऊ पैसोडे (सामाजिक कार्यकर्ता, अंत्री), संगीताताई कोळसे (सामाजिक कार्यकर्त्या, अंत्री) प्रियंकाताई मुकुंदा क्षिरसागर (धा.बढे), कविताताई रामशंकर सोनुने (धा.बढे), ज्ञानेश्वर सुरडकर (सामाजिक कार्यकर्ते, अंत्री) योगेशभाऊ सुभाष महाजन (सामाजिक कार्यकर्ते लिहा. बु.) आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

             बुलडाणा तालुक्यातील गणेशराव उत्तमराव रिंढे (ग्रामपंचायत सदस्य, तांदळुवाडी), सिद्धार्थभाऊ शंकर खरे (माजी उपसरपंच, तांदळुवाडी), सुनीलभाऊ यशवंत रिंढे (ग्रामपंचायत सदस्य, तांदळुवाडी), विठ्ठलभाऊ पुंडलिक लांडगे (माजी ग्राम सदस्य, तांदळुवाडी), सुरेशभाऊ पंजाबराव रिंढे (समाजसेवक, तांदळुवाडी), योगेशभाऊ शेषराव रिंढे (समाजसेवक, तांदळुवाडी), सुरेशभाऊ बाबुराव रिंढे (माजी ग्रा.पं.सदस्य, तांदुळवाडी), सुरेशभाऊ का‍शिकर (सामाजिक कार्यकर्ते, तांदुळवाडी), दिपकभाऊ शेनफड रिंढे, (माजी सरपंच, तांदुळवाडी), योगेश शेषराव रिंढे (सामाजिक कार्यकर्ते), दगडुभाऊ तेजराव शेळके (सामाजिक कार्यकर्ते, सव), आनंताभाऊ माधवराव शेळके (सामाजिक कार्यकर्ते, सव), शालिग्रामभाऊ जवंजाळ (सामाजिक कार्यकर्ते, सव), दिलिपभाऊ शेळके (सामाजिक कार्यकर्ते, सव), दिलिपभाऊ पवार (ग्रा.पं.सदस्य, सव), ज्ञानेश्वरभाऊतायडे (सामाजिक कार्यकर्ते, अंत्री तेली), सतिषभाऊ नारायण शेळके (ग्रा.पं.सदस्य, सव), सुनिलभाऊ आत्माराम बाहेकर (सामाजिक कार्यकर्ते, सव), विजयभाऊ डुकरे (सामाजिक कार्यकर्ते, खुपगाव), रुस्तुमभाऊ भगवान शेळके (सामाजिक कार्यकर्ते, सव), कृष्णाभाऊ तुकाराम पंडीत (सामाजिक कार्यकर्ते, सव), सुखदेवभाऊ सुरडकर (सामाजिक कार्यकर्ते, सव), शालिग्रामभाऊ शेळके (सामाजिक कार्यकर्ते, सव) आदींसह अनेक ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.

          याशिवाय वसंतराव गोविंदराव इंगळे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष व माजी ग्राम सदस्य, डोंगरखंडाळा), संतोषभाऊ अवचितराव इंगळे (ग्रामपंचायत सदस्य, डोंगरखंडाळा), सोपानभाऊ बळीराम चव्हाण (माजी ग्राम सदस्य, डोंगरखंडाळा), सुभाषभाऊ देवसिंग राठोड (माजी ग्राम सदस्य, डोंगरखंडाळा), गजाननभाऊ राजाराम इंगळे (सामाजिक कार्यकर्ता, डोंगरखंडाळा), सुभाषभाऊ उत्तम काकडे (सामाजिक कार्यकर्ता, डोंगरखंडाळा), राजूभाऊ पवार (माजी ग्रा.पं.सदस्य, डोंगरखंडाळा), जगदिशभाऊ वानखेडे (सामाजिक कार्यकर्ते, डोंगरखंडाळा), कैलासभाऊ सावळे (सामाजिक कार्यकर्ते, डोंगरखंडाळा), अशोकभाऊ सावळे (सामाजिक कार्यकर्ते, डोंगरखंडाळा), मधुकरभाऊ चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते, डोंगरखंडाळा) यांचाही पक्षप्रवेश झाला.

        महिला कार्यकर्त्यांमध्ये अनिताताई गायकवाड (माजी सरपंच, करणखेड), शोभाताई रिंढे (माजी सरपंच, तांदळुवाडी), मीराबाई कैलास बहादरे (सरपंच, अंत्री), सुनीताताई गायकवाड मा . ग्रा. पं. सदस्य, भावनाताई पाटील (उद्योजिका, बुलडाणा), संगीताताई कोळसे अंत्री , अनुश्रीताई जाधव, प्रियंकाताई क्षीरसागर, रत्नाताई शेळके, अर्चनाताई शेळके, स्मिताताई वराडे, शुभांगीताई बाहकेर, गोदावरीताई काळे, सुनंदाताई खरात आदींचाही समावेश आहे.

       या प्रवेश सोहळ्यासाठी विनायकजी राऊत , जिल्हा संपर्कप्रमुख नरुभाऊ खेडेकर जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, जिल्हा समन्वयक प्रा.डी. एस. लहाने, उपजिल्हाप्रमुख आशिषदादा रहाटे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख विजयाताई खडसान यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.