लोणार तालुक्यातील हिरडव येथे 'महाराजस्व समाधान शिबिराचे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते उद्घाटन

लोणार तालुक्यातील हिरडव येथे 'महाराजस्व समाधान शिबिराचे  केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते  उद्घाटन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        शासनाच्या विविध योजनेचा लाभ सहजपणे ,शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे . या अभियानाचा लाभ ग्रामीण जनतेने घ्यावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

         सामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या लोणार तालुक्यातील हिरडव येथे आज 14 मार्च रोजी 'महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचे उद्घाटन केद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते झाले,  त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. 
        यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय रायमुलकर, तहसीलदार भूषण पाटील,  शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ मापारी उपस्थित होते.
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज जे अर्ज स्वीकारले आहे त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी साहेबी थाट बाजुला सारून जनतेचे काम करावे.  तुम्ही आम्ही जनतेचे सेवक आहोत, जनतेच्या हिताचे कामे वेळेचे आत पूर्ण करून देण्याचे निर्देशित त्यांनी यावेळी दिले. या शिबिरात महसूल विभागासह इतर १५ हून अधिक विभागांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. 

या शिबिरात : महसूल सेवा: डिजिटल ७/१२, ८अ वाटप आणि फेरफार प्रकरणांचा निपटारा,  शासकीय दाखले: उत्पन्न, जात आणि रहिवासी दाखल्यांचे त्वरित वितरण,  आरोग्य आणि कल्याण: 'आभा' (ABHA) कार्ड आणि आयुष्मान भारत कार्डांचे प्रत्यक्ष वाटप,  शेतकरी योजना: पीएम किसान ई-केवायसी (E-KYC) आणि युनिक फार्मर आयडी निर्मिती यासह आदींचा समावेश आहे. यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि लाभ वाटप करण्यात आहे.

* रेणुकाबाईच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्याचे मंत्री महोदयांनी दिले निर्देश : 

       शिबिरातील स्टॉलला भेटी देत असताना लोणार तालुक्यातील वढव येथील रेणूकाबाई फड यांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे घर नसल्यांची कैफियत मांडली.   त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सदरहू महिलेकडे घर बांधण्यासाठी जागा नसल्याचे सांगितले. यावर मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सांगितले की,  पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत 1 लाख रुपये जागा घेण्यासाठी मिळतात . त्या पैशातून सदरहू महिलेला जागा घेवुन द्या, आणि घरकुल योजनेत घर बांधण्यासाठी मदत करा, असे ही निर्देश यावेळी दिले. मंत्री महोदयांनी दखल घेऊन अधिकाऱ्यांनाच काम करण्याची निर्देश दिल्यामुळे रेणूकाबाईच्या चेहऱ्यावर हास्य फुललं.