* वाढदिवसानिमित्त संदीपदादा शेळकेंवर शुभेच्छांचा वर्षाव
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त १३ मार्च रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रम खास ठरला. जिवाभावाच्या माणसांसह सर्वच राजकीय पक्ष आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला.
सकाळी संदीपदादा शेळके यांनी राजर्षी शाहू परिवाराचे आधारवड भाऊसाहेब शेळके यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मोठी देवीला पातळ चढवून दर्शन घेतले. गर्दे वाचनालय सभागृहाच्या प्रवेशद्वारावर त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. कन्या गार्गी हिने वडिलांना केक भरवला. भेटीसाठी आलेल्या प्रत्येकाच्या शुभेच्छांचा संदीपदादा शेळके यांनी स्वीकार केला. यावेळी अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके, शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, अदिती अर्बनचे अध्यक्ष सुरेश देवकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, विश्वजित पडोळ, पाटील, शिवराज पाटील, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, संचालिका सुरेखाताई तायडे, छायाताई शेळके यांच्यासह राजकारण, समाजकारण, सहकार, उद्योग, विधी, आरोग्य, शिक्षण यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सकाळपासून भेटीसाठी मान्यवरांची गर्दी झाली होती.
* रक्तदानाच्या महायज्ञात २२०० पिशव्या रक्त संकलित ; राज्यभरात ७४ शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संदीपदादा शेळके यांच्या संकल्पनेतील रक्तदानाच्या महायज्ञाअंतर्गत २२०० पिशव्या रक्त संकलन झाले. राज्यभरात आयोजित ७४ शिबिरांच्या राक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी १ फेब्रुवारी रोजी छत्रपतींची भूमी सातारा येथून रक्तदानाच्या महायज्ञानाला प्रारंभ झाला. राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्या संयुक्त विद्यमाने संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात ७४ ठिकाणी ही रक्तदान शिबिरे घेण्यात आली. एकाचवेळी राज्यात सर्वात जास्त रक्तदान शिबिरे घेण्याच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.शिबिरांमधून संकलित रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येते. दरवर्षी रक्तदात्यांकडून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यंदा महाशिवरात्रीनिमित्त डोंगरशेवली येथे आयोजित रक्तदान शिबिरात मुस्लिम बांधवांनी रक्तदानात सहभाग घेत आदर्श ठेवला. उन्हाळ्यात दरवर्षी रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवतो. बऱ्याचदा या महिन्यात आवश्यक शस्त्रक्रिया असतात. रक्तदानाची कमतरता जाणवते. रक्तपेढी व्यवस्थापनाकडून रक्तदान शिबिरांचे आवाहन करण्यात येते. गरजू रुग्णांना लाभ मिळावा, या उद्देशाने राजर्षी शाहू परिवाराच्यावतीने नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते.
