* मुंबई येथील टिळक भवनात प्रवेश सोहळा उत्साहात
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. ही बाब अतिशय स्वागताहार्य आहे. जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास असलेल्या या दमदार नेतृत्वामुळे पक्षसंघटनाला बळ मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
मुंबई येथील टिळक भवनात १० मार्च रोजी दुपारी त्यांच्या हस्ते संदीप शेळके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी सपकाळ बोलत होते. मंचावर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रवक्ता सचिन सावंत, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, काँग्रेस हा तळागाळातील शोषित, वंचित घटकांना न्याय देणारा पक्ष आहे. देशाचे संविधान सर्वश्रेष्ठ मानून काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. आपले संस्कार आणि मूल्ये जपत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. आजोबा दिवंगत उत्तमराव पाटील यांच्यामुळे आपणास काँग्रेसचा वारसा आहे. पक्षाकरिता झोकून काम करण्याचे अभिवचन देत कहो फिरसे.. काँग्रेस दिलसे असा नारा त्यांनी दिला. जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे म्हणाले की, राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून संदीप शेळके यांचे राज्यभरात काम आहे. वन बुलढाणा मिशनचा विचार रुजवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. त्यांच्या नेटवर्कचा पक्षाला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
पक्षप्रवेश सोहळ्याला वासुदेव अंबादास पाटील, विलास वायझोडे, गजानन पाटील, विनोद जुनारे, किसनराव धामोडे , गजानन पऱ्हाड, भागवत दाभाडे, अनिल ढगे, राम पाटील, इरफान पठाण, अँड. मोहतेशम अँड. जावेद कुरेशी, मोहम्मद वसीम, अजहर देशमुख, जुनेर पटेल, सचिन पालकर, विक्रम देशमुख , जाकिर मेमन, गजफर खान, प्रदीप शेळके, एकनाथ शेळके, गजानन शेळके, शंकर राऊत, सागर सवडे , सतीश मुडे, पवन उन्हाळे, पंकज काळे, नितीन पाटील, मनीष देशमुख, गोपाल काळे, शिवचरण काळे, संदीप उन्हाळे, विठ्ठल पा. अवचार, दत्ता पाटील, श्याम वायझोडे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
