विविध मुद्द्यांवर आमदार धीरज लिंगाडे यांनी गाजविले अर्थसंकल्पीय अधिवेशन

विविध मुद्द्यांवर आमदार धीरज लिंगाडे यांनी गाजविले अर्थसंकल्पीय अधिवेशन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्राला भेडसावत असणाऱ्या विविध मुद्द्यांवर अमरावती पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार धीरज लिंगाडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे.
       यामध्ये प्रामुख्याने आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांच्या NPS खात्यातील जमा रकमेबाबत सभागृहात प्रश्न उचला. तसेच युनिफाईड पेन्शन स्कीम (युपीएस) अटी शर्ती अद्याप जाहीर झालेल्या नाहीत याबाबत शासनाने तत्काळ स्पष्ट खुलासा करावा. शैक्षणिक संस्थांकडून फायर NOC संदर्भात आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याबाबत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था (प्रवेश व शुल्क विनियमन) विधेयकाच्या संदर्भात महत्त्वाची मागणी करत आमदार धीरज लिंगाडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मोठे शहर तसेच महानगरामध्ये ओला - उबेर हे त्यांच्या ठरलेल्या मीटर प्रमाणे भाडे न घेता आपले स्वतंत्र व वाढीव भाडे प्रवाशांकडून वसूल करतात ही एक गंभीर बाब आहे. या विषयावर त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
          झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट सारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 20 लाख गिग वर्कर्सच्या हक्काच्या तसेच पदवीधर बेरोजगार सुरक्षा वेतन व सामाजिक संरक्षणासाठी आमदार धीरज लिंगाडे यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 260 च्या प्रस्तावा द्वारे नगरपालिका, महानगरपालिकेतील गैरप्रकार व ढासाळलेल्या नागरी सुविधांच्या तसेच वाढलेल्या भ्रष्टाचाराबाबत शासनाची भूमिका या विषयावर सभागृहात भूमिका मांडली.
        या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार धीरज लिंगाडे यांनी समाजातील विविध मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले यामुळे भविष्यात सामाजिक बांधिलकी असलेल्या विषयांवर सभागृहात विविध प्रश्न उपस्थित केल्या जातील याबाबत शंका नाही.