उन्हाळ्याच्या सुट्टीत नवीन बस गाड्या सुरू करा * भाजपा शहर सरचिटणीस किरण नाईक यांची मागणी

उन्हाळ्याच्या सुट्टीत नवीन बस गाड्या सुरू करा 
* भाजपा शहर सरचिटणीस किरण नाईक यांची मागणी 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळ नवीन बस गाड्या सुरू करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे शहर सरचिटणीस किरण नाईक यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभाग नियंत्रक श्रीमती शुभांगी शिरसाट यांच्याकडे 13 मार्च रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
       दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे लोणार,  मेहकर,  चिखली, बुलढाणा येथील व्यापाऱ्यांना येण्या - जाण्यासाठी सोयीचे होईल,  या अनुषंगाने भुसावळ जंक्शन रेल्वे स्टेशन तसेच एसटी महामंडळाकडून सेवाग्राम एक्सप्रेस रेल्वे या गाडीवरती मलकापूर ते चिखली बस सुरू होती. परंतु काही कारणास्तव ही बस बंद करण्यात आली. तरी नागरिकांची मागणी लक्षात घेता, सेवाग्राम एक्सप्रेस रेल्वे या गाडीवरती कायमस्वरूपी बस सेवापूर्वरत सुरू करून नागरिकांना सेवेचा लाभ होईल, असा निर्णय घेऊन बंद झालेल्या बस सुविधा तात्काळ सुरु करण्यात याव्या. तसेच बुलढाणा ते नंदुरबार किंवा शिरपूर वाया भुसावळ चोपडा, जळगाव जामोद ते शिर्डी वाया बुलढाणा, सिल्लोड, वैजापूर किंवा गंगापूर, बुलढाणा ते रावेर वाया सावदा फैजपूर, बुलढाणा ते अक्कलकोट, मेहकर ते सुरत वाया चिखली,  बुलढाणा,  भुसावल,  जळगाव, धुळे तसेच रात्री मलकापूर ते चिखली या नवीन बस सेवा सुरू करण्यात याव्या,  अशी मागणी सुद्धा किरण नाईक यांनी निवेदनातून केली आहे.