शिक्षक मतदार संघ निवडणूकिसाठी प्रा. लहाने यांचे नाव चर्चेत* शिवसेना उबाठाकडून महाविकास आघाडीकडे दावेदारीची शक्यता !

शिक्षक मतदार संघ निवडणूकिसाठी प्रा. लहाने यांचे नाव चर्चेत
* शिवसेना उबाठाकडून महाविकास आघाडीकडे दावेदारीची शक्यता !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      शिक्षक मतदार संघाची निवडणूक जवळ येत आहे. निवडणूक जसी जवळ येत आहे तसतसे नवीन राजकीय समीकरणे देखील तयार होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ही निवडणूक आव्हानात्मक करण्याचा पूर्ण प्रयत्न यंदा होत आहे.सामाजिक चेहरा लाभलेल्या प्रा. डी एस लहाने यांना यासाठी गळ घातली जात असून मातोश्रीवर देखील त्यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती आहे.लहाने स्वतः शिक्षक राहिलेत,त्यांना उमेदवारी मिळाल्यास ही निवडणूक चुरशीची व विरोधकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते.

        पाच जिल्ह्यातील व्याप्त मतदार संघामध्ये बुलढाणा येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे सह संपर्कप्रमुख डी एस लहाने यांची देखील या मतदार संघावर सुरुवातीपासून नजर होती. 
डिसेंबर २०२० मध्ये झालेली ही निवडणूक तेंव्हा चांगलीच गाजली होती. आता शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज भवितव्य आजमावण्यासाठी मतदार नोंदणीच्या धावपळीला लागले आहेत. या मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला होता. डी. एस. लहाने यांचा शैक्षणिक क्षेत्रातील वावर आणि सामाजिक क्षेत्रातील काम मोठ आहे. सहकार क्षेत्रातून सामान्यांच्या उन्नतीसाठी देखील त्यांनी प्रयत्न चालवले आहे. महत्त्वाचे म्हणजे विधवा महिलांच्या पुनर्विवाहाची चळवळ गतिमान करून त्या दृष्टीने राज्यभर त्यांनी आपल्या कामातून नवी ओळख मिळवली आहे. लहाने यांच्यासारख्या सामाजिक चेहरा असलेल्या व्यक्तीने ही जागा लढवण्यासाठी समर्थकांकडून जोर लावल्या जात आहे. त्यातच काल-परवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश घडून आला.          यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली. या भेटीत डी.एस. लहाने यांच्या अमरावती शिक्षक मतदार संघाच्या बाबत उमेदवारीवर चर्चा झाल्याचे समजते. प्राथमिक स्वरूपात झालेल्या या चर्चेनंतर आगामी काळात डी. एस. लहाने यांची उमेदवार म्हणून एन्ट्री झाल्यास राजकीय समीकरण बदलतील हे सांगण्याची गरज नाही. स्वच्छ प्रतिमा, स्वतः शिक्षक असल्याने शिक्षकांच्या समस्यांची चांगली जाणीव, समाजकारणाची विशेष आवड व निवडणुकीसाठी लागणारे अर्थकारण या सर्वच बाबींमध्ये प्रा. लहाने फिट बसतात. त्यामुळे लहाने उमेदवार राहील्यास निवडणूक चुरशीची ठरू शकते.