* छत्रपती संभाजीनगर शाखेचा स्थलांतर व दशकपूर्ती सोहळा उत्साहात
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राजर्षी शाहू मल्टिस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटीने शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, वंचित घटक, सामान्य नागरिकांना नेहमीच पाठबळ दिले. यामाध्यमातून लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपला, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.
वाळूज, छत्रपती संभाजीनगर शाखा स्थलांतराचा उदघाटन सोहळा १६ फेब्रुवारी रोजी बजाज नगर, वाळूजमधील जागृत हनुमान मंदिरासमोर उत्साहात संपन्न झाला. यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके होते. यावेळी आरोग्य चिकित्सा व रक्तदान शिबीर सुद्धा संपन्न झाले. अध्यक्षस्थायावरुन बोलतांना संदीपदादा शेळके म्हणाले,
राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या गारखेडा शाखेचा १० वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते शुभारंभ झाला होता. वाळूज शाखेचा एकूण व्यवसाय ११ कोटी रुपये आहे. त्यापैकी सोनेतारण कर्ज ५ कोटी रुपये आहे.सातत्याने राजर्षी शाहू परिवाराने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक सेवा देतांना सुरक्षित कर्ज वाटपाची भूमिका घेतली आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, संस्थेच्या संचालिका सुरेखाताई तायडे, मा.डॉ. दत्तात्रय काटे,(उद्योजक अभियंता व अर्थ विषयक अभ्यासक), मेजर अरुण सुरासे ( इन्फिनिटी अकॅडमी ) काठोळे सर माजी क्षेत्र व्यवस्थापक एमआयडीसी छ.संभाजीनगर, ललिता सोनवणे (नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य वाळूज ) विष्णू पाटील जाधव (शिवसेना ता. प्रमुख ) दत्तात्रय वरपे (पंचायत समिती सदस्य ) सतिश हिवाळे (पंचायत समिती सदस्य ) नीलेश सोनवणे (गरुड झेप अकॅडमी) अनिता पाटील (ता. संघटक शिवसेना ) शारदा घायवट ( विभाग प्रमुख शिवसेना ) प्रल्हाद शेळके, राजेंद्र तिडके, (स्थानिक संचालक) जनार्धन शेवाळे (स्थानिक संचालक ) संतोष कुंभार (स्थानिक संचालक ) रंगनाथ ठुबे ( सेक्रेटरी, जागृत हनुमान मंदिर ) बबासाहेब उगले, संजय शहाणे (मा. सरपंच वडगाव कोल्हाटी) अनिल पाटील (अध्यक्ष जागृत हनुमान मंदिर ट्रस्ट ) सुधाकर शेवाळे, विष्णू राऊत (मा.सरपंच पाटोदा गंगापूर ) तसेच स्थानिक संचालक , खातेदार, ठेवीदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. संचालन विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले यांनी केले.
