राज्य पेन्शनर्स संघटनाचे देशव्यापी मोर्चा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
कर्मचारी कामगारांच्या प्रलंबीत मागण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२६ ला तिव्र आंदोलन करीत महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना जिल्हा शाखा बुलढाणा च्या वतीने देशव्यापी मोर्चा करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिलेलेल्या निवेदनात नमूद आहे की, आमच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असून केवळ आश्वासन देवून वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे कर्मचारी व कामगारांमध्ये असंतोष आहे. आठवा वेतन आयोग, प्रलंबीत महागाई भत्ता व त्याचे एरीयस, मेडिकल अलाउंस, व मुख्यतः कर्मचारी कामागारा विरोधात नव्याने येऊ घातलेल्या चार श्रमसंहिता तातडीने रद्द कराव्यात हा या आंदोलनाच्या मागचा हेतू आहे. सदर आंदोलन हे जिजामाता स्टेडियम येथून मोर्चा मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकला. पुढे निवेदनात नमूद आहे की, आंदोलनाची गांभीर्याने व तत्परतेने दखल घेवून आमच्या मागण्या रास्त असून शासनाने त्या मंजूर करून होणारा अन्याय दूर करावा, सदर आंदोलनात सर्व सीटू महिला कर्मचाऱ्यांनी तसेच पेन्शनर्स च्या विविध संघटना तसेच पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला.
