* विकास राऊतचे अन्नत्याग आंदोलन
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
संभाजीनगर (औरंगाबाद) च्या महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या एनएसकेएफडीसी कर्ज योजनेतील प्रलंबित प्रस्तावाच्या निषेधार्थ रिपाई आठवले पक्षाच्या वतीने पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता विकास भास्कर राऊत विश्रांती नगर, मुकुंदवाडी यांनी गेली चार वर्षापासून महामंडळाच्या (NSKFDC) योजने अंतर्गत कर्ज प्रकरण दिले आहे. पण महामंडळाच्या प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रलंबित आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे माझे व माझ्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जीवन जगणे असह्य झाले आहे, महामंडळ प्रशासनाच्या या अन्यायकारक भूमिकेचा निषेध करण्यासाठी मी एक रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाचा कार्यकर्ता असल्यामुळे रिपाइंच्या बॅनर खाली 25 फेब्रुवारी 2026 रोज बुधवार पासून संभाजीनगर (औरंगाबाद) च्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात, जोपर्यंत माझे कर्ज मंजूर होऊन त्यांचे लेखी आदेश मिळत नाही, तोपर्यंत विना मंडप उणवारा पाऊस कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता जीवावर उदार होऊन अमरण उपोषणास बसत आहे.
कर्जप्रकरणाच्या कागद पत्राची दखल घेतली नाही, त्या कागद पत्राचे भक्षण करून अमर अन्नत्याग उपोषणाच्या आंदोलनाचे निवेदन 9 फेब्रुवारी 2026 रोजी संभाजीनगर जिल्हाधिकारी, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग संभाजीनगर व जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ संभाजीनगर , तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिटी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) यांना निवेदन दिले.
या निवेदनातून शासन, प्रशासनास इशारा दिला आहे की, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अखंड चालू राहील. या आंदोलना दरम्यान माझ्या जीवीतास काही बरे वाईट झाले तर त्यास शासन प्रशासन संबंधित विभागाचे मंत्री, सचिव जबाबदार राहतील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
