* जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य जन आक्रोश मोर्चा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नगर पालिकेच्या हद्द वाढीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नगर विकास विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा शहरालगत असलेल्या सुंदरखेड, सागवान, माळविहीर, येळगाव या गावांचा समावेश आहे. मात्र या निर्णयाला नागरिकांचा विरोध होत आहे. आज या विरोधात चारही गावातील नागरिक प्रा.डी.एस. लहाने यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढन्यात आला. आम्हाला गावची ग्रामपंचायतच हवी असा सूर यावेळी निघाला तर नगरपालिकेची हद्द वाढ मुळीच करण्यात येऊ नये. ग्रामपंचायती हद्दीतच गावांचा विकास झाला पाहिजे असे मत प्रा. डी. एस. लहाने यांनी मोर्चाला संबोधित करतेवेळी मांडले.
दुपारी 12 वाजता रेस्ट हाऊस परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. हातात फलक घेतलेले शेकडो आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. तिथेच प्रा. डी. एस. लहाने, सुनिल सोनुने, ऍड. दशरथसिंग राजपूत, सतिष भाकरे पाटील, रविंद्र भाकरे पाटील, प्रतिक जाधव,
सुरेश कंकाळ, श्रीकांत जाधव,
व इतर गावातील सरपंचांनी मोर्चाला संबोधित केले. यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार नगरपालिकेमध्ये आमच्या गावाचा समावेश करण्यात येऊ नये अशा पद्धतीचे सर्वच ग्रामपंचायतीने ठराव घेतले आहे. गावचा विकास नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करून नव्हे तर ग्रामपंचायती त्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे ही गावे ग्रामपंचायतीत आहे तशी राहावी अन्यथा या निर्णयाविरोधात यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चामध्ये सागवान, सावळा, सुंदर खेड, व परिसरातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
