जायंटस सहेली ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

जायंटस सहेली ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
        जायंटस वेलफेअर फाउंडेशन द्वारा संचलित जायंटस सहेली ग्रुप देऊळगावराजा च्या वतीने शहरातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश चे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या सहेली ग्रुपने नव्यानेच ग्रुपची स्थापना झाल्यानंतर विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे.                       समाजामध्ये वावरताना समाजाचे आपल्याला काहीतरी देणे लागते ही भावना मनात ठेवून व ज्या शालेय विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती हलाखीची आहे. अशा विद्यार्थिनींना ग्रुपच्या वतीने गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी जायंटस ग्रूपचे अध्यक्ष किशोर अंबुस्कार , सहेली ग्रुपच्या अध्यक्षा किरण अंबुस्कर, सचिव सौ.लता हरकुट, मालती ताई कायंदे राखी काबरा उपस्थित होत्या.