शिवकालीन वारसा: बावनबुरजी बचाव कृती समितीचा पुढाकार* जिजाऊ महोत्सवाच्या धर्तीवर आता करवंड महोत्सव - हरीरुद्र राजे

शिवकालीन वारसा: बावनबुरजी बचाव कृती समितीचा पुढाकार
* जिजाऊ महोत्सवाच्या धर्तीवर आता करवंड महोत्सव - हरीरुद्र राजे
* कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यभरातून व्यापक प्रतिसाद!
 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         छत्रपती शिवाजी महाराज हे बुलढाणा जिल्ह्याचे जावई ही ओळख असपस्ट राहिली आहे. सिंदखेड राजाला राजांचे आजोळ तर 52 बुरजी अर्थात करवंडला त्यांची सासरवाडी. छत्रपती घराण्यात दोन मुली देणाऱ्या करवंड गावचा इतिहास आजवर दुर्लक्षित राहिला. हा ऐतिहासिक ठेवा पुढे आणून शिवकालीन वारसा जतन करण्यात यावा यासाठी 52 बुरजी बचाव कृती समितीने पुढाकार घेत जिजाऊ महोत्सवाप्रमाणे करवंड महोत्सव आयोजित करण्याचे ठरविले आहे. यासाठी महत्त्वपूर्ण बैठक 4 जानेवारी रोजी करवंड गढी परिसरात पार पडली. आठ जिल्ह्यातील शिवप्रेमी यावेळी उपस्थित राहिले. करवंड महोत्सव केवळ एक उत्सव नसून इतिहासाचा दडलेला ठेवा नवीन पिढी समोर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे इंगळे सरदार घराण्यातील हरिहरूद्र राजे यावेळी म्हणाले.

            हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातव्या पत्नी महाराणी गुणवंताराणी साहेब ह्या मुळच्या बावनबर्जी म्हणजेच आजचे करवंड येथील सरदार शिवाजीराव इंगळे यांच्या कन्या होत्या. त्यांचा विवाह १५एप्रील १६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत झाला. हा मुद्दा प्रकाश झोतात आल्यानंतर ह्याच दिवसाचे औचित्य साधून बावनबर्जी बचाव कृती समितीच्या वतीने १५ एप्रिल २०२६ रोजी करवंड महोत्सव आयोजित करण्याचे ठरले. यासाठी बैठकीचे आयोजन ४ जानेवारी रोजी करवंड येथे करण्यात आले. 
        यावेळी उपस्थितांनी जिजाऊ जन्मोत्सवाच्या धर्तीवर करवंड महोत्सव यशस्वी करण्याचा संकल्प करून छञपती शिवाजी महाराज व गुणवंताराणी साहेब यांच्या विवाह सोहळ्याची अनुभूती महोत्सवाच्या रूपाने महाराष्ट्राला पुन्हा एकदा करून देण्याचा निर्धार केला. यावेळी राजे हरिरूद्र प्रसाद इंगळे, चिखली पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद देशमुख, महाराष्ट्र मराठा सोयरीक चे समन्वयक व करवंड महोत्सवाचे संकल्पक सुनिल जवंजाळ, आनंदी गृपचे समन्वयक प्राचार्य अन्नासाहेब म्हळसने, देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती गणेशराजे जाधव, जिजाऊ जन्मोत्सवाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.नाईकवाडे , युद्धभूमी आसई ता. भोकरदन येथील सेवानिवृत्त डीवायएसपी दिलीपराव पाटील इंगळे, प्रल्हाद पाटील इंगळे, दत्ताजी इंगळे बीड, शिव व्याख्याते कृष्णा पाटील इंगळे, माजी सभापती अंकुशराव वाघ, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऎडव्होकेट विजय सावळे, पञकार राजेंद्र काळे, गणेश निकम केळवदकर, संदीप वानखेडे, युवराज वाघ, सोहम घाडगे, पप्पू राऊत, विनोद सावळे, विजय घ्याळ , श्याम देशमुख इतिहास संशोधक रामेश्वर शेडगे, चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती मोहनराव जाधव, माजी सरपंच प्रकाश चव्हाण, भास्करराव आढळकर, मुख्याध्यापक राम इंगळे, नारायण सुर्वे, साभाष करंडे, सुनिल करंडे, जगदीश सपकाळ, पंढरीनाथ गुंजकर, प्रा.निलेश इंगळे, प्रा.डिगांबर कानडजे, रिसोड येथील बबनराव मोरे, डॉ. तेजराव नरवाडे, पोलीस पाटील विठ्ठल पीवळ प्रा. अनिल हेलगे, राजेंद्र रिंढे, संजय रिंढे यांचेसह परिसरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
         गेल्या काही दिवसापासून कृती समितीच्या माध्यमातून संकल्पक सुनील जवंजाळ पाटील यांच्या पुढाकारात शासन दरबारी पत्र व्यवहार देखील करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अरविंद बापू देशमुख यांनी या कामासाठी विशेषत्वाने पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय घ्याळ यांनी केले तर आभार श्याम देशमुख यांनी मानले.

* देशमुख यांच्याकडून लाखाचा निधी :

       महोत्सवासाठी निधी संकलनाचे काम सुरू असून शिवाजी शिक्षण संस्थेचे संग्राम देशमुख यांनी बैठकीमध्ये एक लाख, पंधरा हजार रुपयांचा निधी दिला. पोलीस पाटील विठ्ठल पीवळ १५०००, प्रा. नाईकवाडे ११०००, डॉ. नरवाडे सावळी, १११११, बबनराव मोरे, रिसोड ११०००, प्रा.राम जगन इंगळे ५०००, गणेशराव राजे जाधव, सि. राजा ११०००, एकनाथराव देशमुख, करवंड ५०००, जगन्नाथ भांड करवंड ११११,
वरील प्रमाणे निधी देण्याची घोषणा करण्यात आली.