* सुंदरखेड येथील शिबिरात २५० रुग्णांची आरोग्य तपासणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
व्यावसायिक जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्यात कायम पुढाकार घेणारे माऊली पेट्रोलिक्सचे संचालक प्रतीक गायकवाड हे समाजशील नेतृत्व आहे, असे गौरवोद्गार वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी काढले.
माऊली पेट्रोलिक्सचा तृतीय वर्धापन दिन आणि संचालक प्रतीक गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळगाव खान्देश येथील गोदावरी फाऊंडेशनच्यावतीने ४ जानेवारी रोजी सुंदरखेड येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरप्रसंगी ते बोलत होते. आरोग्य तपासणी शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी २५० रुग्णांची तपासणी केली. तसेच त्यांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या ४५ रुग्णांना पुढील उपचारासाठी जळगावला पाठवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
प्रास्ताविकातून प्रतीक गायकवाड यांनी आरोग्य तपासणी शिबिर आयोजनामागची भूमिका मांडली. राजर्षी शाहू मल्टीस्टेटचे संचालक पृथ्वीराज राजपूत यांनी संचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय तोमर, सुहास राठोड, विजय शेगोकार, मंगेश राजपूत, पवन गायकवाड, ज्ञानेश्वर राजपूत, पंकज राजपूत, सुहास हिवाळे, समीर जाधव, गणेश गायकवाड, मयूर गायकवाड, अजय राजपूत, किरण राजपूत यांनी परिश्रम घेतले.
