पूर्णा नदीच्या घाटातून पंपिंग मशीन द्वारे अवैधपणे वाळूचा उपसा * नांदुरा तहसिल कार्यालय समोर केले डफडे बजाव आंदोलन

पूर्णा नदीच्या घाटातून पंपिंग मशीन द्वारे अवैधपणे वाळूचा उपसा 
*  नांदुरा तहसिल कार्यालय समोर केले डफडे बजाव आंदोलन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         जिल्ह्यातील  घाटा खालून वाहणारी पूर्णा नदीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी सुरू आहे. सदर उपसा त्वरित बंद करण्यात यावे यशसाठी नांदुरा तहसील कार्यालयात डफडे बजाव आंदोलन करून समाजवादी पार्टीचे नेते आझाद खान यांच्या नेतृत्वात 20 जानेवारी रोजी नांदुरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

          दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, जिल्ह्यातील जवळपास सर्वच रेती घाटांचा लिलाव झालेला आहे मात्र लिलावधारक वाळू घाटात पंपिंग मशीन चालवू शकत नाही, असे शासनाचे आदेश असतांना प्रशासनाला ना जुमानता काही लिलावधारकांनी तर चक्क नदीतच पंपिंग मशीन बसवले असून त्याद्वारे सर्रास वाळूचा उपसा केला जात आहे. 

      पुढे नमूद आहे की, तालुक्यातील पलसोडा, बेलाड, रोटी या घाटात नियमांची पायमल्ली केली जात असून समाजवादी पार्टीने अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिले, मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ही यावेळी आझाद खान यांनी केला आहे. अवैधरित्या  पूर्णा नदीत बसविण्यात आलेले पंप काढून नियम धाब्यावर बसविणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.