देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे व्हाइस ऑफ मीडिया चे तालुका अध्यक्ष अर्जुन आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली 21 जानेवारी रोजी बैठक पार पडली असून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे व्हाइस ऑफ मीडिया च्या तालुका अध्यक्षपदी पुण्यनगरी चे प्रतिनिधि विलास जगताप, उपाध्यक्षपदी विजय जाधव व शेख हनीफ, सचिवपदी पुण्यनगरी चे प्रतिनिधि सन्मतीजैन, कोषाध्यक्षपदी पूजा कायंदे, सहसचिव पदी गजानन भालेकर, प्रसिद्धीप्रमुख पदी नंदकिशोर देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील मतकर, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप हिवाळे, रमेश चव्हाण, अमोल बोबडे, गजानन घुगे, देवानंद झोटे खंडू माटे, गजानन भालेकर आधी पत्रकार बांधव उपस्थित होते.
