दारूची अवैध वाहतुक ; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त


दारूची अवैध वाहतुक ; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          स्थानिक गुन्हे शाखेने बुलढाणा शहरात कारवाई करीत अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करून ३ लाख ५६ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

           पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी प्रमुख सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून जिल्ह्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. १५ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, एक व्यक्ती चारचाकी वाहनातून विनापरवाना विदेशी दारूची चोरटी वाहतूक करीत बुलढाणा शहरातील धाड नाका येथून सर्क्युलर रोडमार्गे चिंचोले चौकाकडे येत आहे. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने चिंचोले चौक येथे नाकाबंदी केली. त्यावेळी सचिन समाधान रिंढे (वय ३१, रा. शेलसुर, ता. चिखली) हा आरोपी त्याच्या ताब्यातील वाहनासह पकडण्यात आला. आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी आरोपीविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.
        ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, दीपक लेकुरवाळे, शेख चांद, अनंता फरतळे, सुनिल मिसाळ, आशा मोरे यांच्या पथकाने केली.